लैंगिक शिक्षणाचा घरोबा
स्त्री-पुरुष संबंधाकडे जात, धर्म, मालक, फसवणूक, बदला, उपभोग या अंगाने न पाहता, त्यातील निखळपणा आणि विकृतीकरण याच अंगानं पाहावं. मालकी आणि जात वगैरे आली की, आपण वैचारिक पातळीवरदेखील अधिक पाशवी बनत जातो. स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. आपली अडचण अशी की, आपण तिच्यातल्या आईला फक्त सन्मानित करतो आणि बाकीची बहीण, बायको वगैरे नाती पायदळी तुडवतो. .......